अमिताभ बच्चन, बेबस दुनियमध्ये असंतोषाची स्वप्ने विकणारा…
जीवनाचा एवढा मोठा दौर पाहिलेल्या, साहिलेल्या आणि खेळलेल्या माणसाबद्दल सुलट बोलता येतं, तसंच उलटही. ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं. आपण पाहतो, तसं जग दिसतं. अमिताभ बच्चन जेव्हा हिंदी सिनेमांचे ‘नायक’ होते आणि लाखो भारतीयांचे ‘हिरो’ होते, तेव्हा मराठीतले एक विचक्षण, कलंदर आणि मस्तमौला लेखक भाऊ पाध्ये हेदेखील अमिताभचे चाहते होते. किती? तर पाच हजारांहून अधिक शब्दांचा भलामोठा लेख लिहिण्याइतपत.......